Friday, June 30, 2023

30.06.2023 apdet

 

awhar Current Weather


Light rain shower

Light rain shower

25

Feels 28 °c

Wind: 16 km/h
SWSW wind
Rain: 1.3 mm
Cloud: 100%
Humidity: 93%

Sunrise: 06:01 AM

Moonrise: 04:16 PM

Phase:

Sunset: 07:20 PM

Moonset: 02:45 AM

Illum: 84.4

12 pm

Light rain shower

25 °c

3 pm

Moderate or heavy rain shower

24 °c

6 pm

Moderate rain

24 °c

9 pm

Moderate or heavy rain shower

24 °c

12 am

Light rain shower

25 °c

3 am

Light rain shower

25 °c

6 am

Light rain shower

24 °c

9 am

Light rain shower

25 °c

Jawhar, India Weather This Week

Jawhar, India weather forecasted for the next 10 days will have maximum temperature of 29°c / 85°f on Mon 03. Min temperature will be 23°c / 73°f on Mon 10. Most precipitation falling will be 121.30 mm / 4.78 inch on Fri 30. Windiest day is expected to see wind of up to 19 kmph / 12 mph on Fri 30. Visit 3 HourlyHourly and Historical section to get in-depth weather forecast information for Jawhar, India.

UV Index

Fri:
5
Sat:
6
Sun:
6
Mon:
6
Tue:
6

UV Scale

Friday, January 29, 2021

 कोल्हापुरातील शेती

कोल्हापूर जिल्ह्याच्या आसपास आणि सुपीक शेती असणे ही कोल्हापूरच्या अर्थव्यवस्थेची कणा आहे. भात आणि ऊस ही या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पीक घेणारे मुख्य पीक आहेत. महाराष्ट्रातील गुळाचे उत्पादन सर्वात मोठे आहे. कोल्हापूर जिल्ह्यात बराच काळापासून ऊस आणि गुळाचे उत्पादन होत आहे. गूळ हा कृषी तज्ञांच्या वतीने दलालाकडून इतर भागांमध्ये विकला जातो. कोल्हापूरची गूळ ही आशिया, आफ्रिका आणि जगभरातील इतर खंडांमध्येही निर्यात केली जाते. कोल्हापूर जिल्ह्यातही बरीच साखर रिफायनरीज आहेत आणि एकत्रितपणे ते 5000000 मेट्रिक टन उसावर प्रक्रिया करतात. स्वत: कोल्हापूरचे ऊस उत्पादक अर्थव्यवस्थेमध्ये अंदाजे 13 अब्ज डॉलर्स आणतात. या प्रदेशातील साखर संपूर्ण भारत आणि परदेशात निर्यात केली जाते.

कोल्हापूरची व्यवसाय व अर्थव्यवस्था
गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्हा भारतातील दरडोई उत्पन्नांपैकी एक आहे. कोल्हापुरात सर्वाधिक मर्सिडीज कार मालक आहेत आणि ते कोलपूर जिल्ह्यात पसरलेल्या साखर कताई व कापड गिरण्यांसह सर्वाधिक मर्सिडीज कार मालक असल्याचा अभिमान आहे. अलीकडच्या काही वर्षांत आर्थिक विकासाच्या बाबतीत हे इतर शहरांपेक्षा निश्चितच पुढे आहे. महाराष्ट्र राज्यात एक प्रमुख गंतव्य म्हणून स्वत: ची स्थापना केली.

कोल्हापुरातील उद्योगांना दोन मुख्य विभागांमध्ये विभागले जाऊ शकते:






Monday, July 13, 2020

APPA: OTHER

APPA: OTHER: इचलकरंजी Jump to navigation Jump to search इचलकरंजी

Sunday, June 28, 2020

इचलकरंजी



इचलकरंजी


इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्याच्या हातकणंगले तालुक्यातील औद्योगिक शहर आहे. लोकसंख्या ,५७,

इतिहास[संपादन]

५७२ (२००१). हे कोल्हापूरपासून सडकेने २३ किमी. पूर्वेस पंचगंगा नदीच्या काठी आहे. इचलकरंजी संस्थानची ही एकेकाळची राजधानी नंतर वस्त्रोद्योगामुळे पुढे आली. इचलकरंजी महाराष्ट्रामधील एक मोठी आणि श्रीमंत नगरपरिषद म्हणून ओळखली जाते. देशभक् डॉरत्नाप्पा कुंभार हे इचलकरंजीतील स्वातंत्र्यसैनिक पहिले खासदार होते.

वस्त्रोद्योग[संपादन]

येथील यंत्रमागावरील कापड हे उर्वरित भारतात भारताबाहेर पाठवले जाते. हातरुमाल, परकर, सदरे, धोतरे, गणवेशाचे कापड असे अनेक वस्त्रांचे प्रकार येथे तयार होतात. येथे अंदाजे लाख यंत्रमाग अंदाजे १०,००० अत्याधुनिक धोटे विरहित यंत्रमाग आहेत. दररोज कोटी २५ लाख मीटर कापडाचे उत्पादन येथे होते. वस्त्रोद्योगातील वार्षिक उलाढाल अंदाजे २५ हजार कोटी आहे. त्यांशिवाय इचलकरंजी येथे साखर, तेल, यंत्रे इत्यादींचे कारखाने निघाले आहेत. शहरातील तंबाखू, शेंग, गूळ इत्यादींची ही बाजारपेठ असून शिक्षणक्षेत्रातही शहर पुढे आहे

वस्त्रोद्योगाचा इतिहास[संपादन]

इचलकरंजीमध्ये पहिला यंत्रमाग कारखाना विठठ्लराव दातार यांनी १९०४मध्ये व्यंकटेश रंग तंतू मिल या नावाने स्थापन केला. इचलकरंजीच्या विकासातील मैलाचा दगड ठरलेल्या सहकारी इचलकरंजी इंडस्ट्रियल इस्टेटची स्थापना कृष्णदेव साळुंखे आणि फुलचंदशेठ शहा या दोन द्रष्ट्या नेत्यांनी केली
इचलकरंजीचे संस्थानिक श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांनी आपल्या कारकिर्दीत लोकहिताची अनेक कामे केली.त्यांच्याच काळात इचलकरंजीमध्ये पहिले हातमाग आणण्यात आले.साचा:दुजोरा हवा आहे. त्यांच्या स्मृत्यर्थ इचलकरंजीतील नाट्यगृहाला कै.नारायणराव घोरपडे नाट्यगृह असे नाव देण्यात आले. या नाट्यगृहाजवळ त्यांचा पूर्णाकृती पुतळा सुद्धा आहे. संगीत कला जपणारे पंडीत बाळकृष्ण बुवा स्मृती मंदिर येथे आहे. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पंडित बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्या स्मृत्यर्थ हे बांधले गेले. १९७४ साली प्रसिद्ध साहित्यिक पु..देशपांडे यांचा अध्यक्षतेखाली अखिल भारतीय साहित्य संमेलन इचलकरंजी येथे पार पडले. इचलकरंजीचे वैभव असलेल्या राजवाड्यात डी.के.टी . टेक्सटाईल ॲंड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूट हे कॉलेज सुरू आहे.१८७० साली नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने सुरु झालेले आणि आता आपटे वाचन मंदिर या नावाने ओळखले जाणारे वाचनालय महाराष्ट्रातील अतिशय जुन्या वाचनालयांपैकी एक आहे

 

 

इचलकरंजीतील खाद्यालये

·         हिरापन्ना लस्सी, मराठा मंडळासमोर.
·         दत्त भेळ, D.K.T.E. कॉलेजसमोर.
·         अवंती वडा, शाहू पुतळ्याजवळ.
·         मधुरा मिसळ, गोविंदराव कॉलेजसमोर
·         इचलकरंजी चौपाटी, सुंदर बाग
·         हनुमान डोसा, सुंदर बाग
·         मटण थाळी,
·         कांबळे खाणावळ, निरामय हॉस्पिटलसमोर
·         जाधव खाणावळ, गांधी कॅम्प.
·         धुत्रे खाणावळ, नगरपालिकेच्या जुन्या इमारतीजवळ
·         विजया केटरर्स, जवाहर नगर
·         बुगड खाणावळ,गांधी कॅम्प
·         बुगड खानावळ : डेक्कन समोर
·         सरकार वाडा,बस स्थानकाजवळ
·         सोनटक्के खाणावळ,गांधी कॅम्प
·         गजानन जाधव खाणावळ,गांधी कॅम्प

गेल्या सात वर्षांपासून इचलकरंजी शहर धगधगतं आणि स्फोटक होत चाललं आहे.


इचलकरंजी जिल्ह्यातील सर्वांत मोठे शहर. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून या शहराचा नावलौकिक. वस्त्रनगरी, मँचेस्टर आणि अनेक जातीधर्मांच्या, प्रांतांच्या सीमेपलीकडे जाऊन एकत्र नांदणारं शहर असा या शहराचा लौकिक होता. मात्र, गेल्या सात वर्षांपासून हे शहर धगधगतं आणि स्फोटक होत चाललं आहे. हे सगळं वातावरण राजकीय धुळवडीला पोषक असलं तरी सर्वसामान्य माणूस आणि उद्योजक या वातावरणात भरडला जातोय, याचे कुणालाच सोरसुतक नाही.

०००००००००००००

इचलकरंजी हे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन नंबरचे मोठे शहर. हे शहर केवळ वीज गेली की शांत असते. एरवी यंत्रमागांच्या खडखडाटाने शहर गजबजल्यासारखे असते. या शहराने जवळपास ५० हजार लोकांना रोजगार दिला आहे. कधी काळी महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून या शहराची ओळख अखंड देशभर होती. संस्थानकाळातील अनेक इमारती, मोठ्या शैक्षणिक संस्था, शहराच्या जवळून वाहणारी पंचगंगा नदी आणि आसपासचा सुपीक भाग यामुळे हे शहर जिल्ह्यातील रोजगाराचे महत्त्वाचे शहर मानले जाते. कालानुरुप प्रत्येक शहराचा चेहरामोहरा बदलत जातो. शहरातील हितसंबंध बदलत जातात. राजकीय नेतृत्वात बदल होत जातो तसेच तेथील राजकीय वातावरण बदलत जाते. इचलकरंजीच्या बाबतीत हेच होत गेले.

सात वर्षांपूर्वी येथे मोठी जातीय दंगल झाली. कर्फ्यू लागला. या काळात दंगलीला कारणीभूत असल्याच्या आरोपावरून सुरेश हाळवणकर यांना अटक झाली. त्यांची सुटका झाली त्यावेळी त्यांची चक्क कळंबा जेलपासून जंगी रॅली काढण्यात आली. पुढे विधानसभा निवडणुकीत प्रकाश आवाडे यांचे त्यांनी पानिपत केले आणि या रॅलीचे विजयी रॅलीत रुपांतर झाले. हाळवणकर आमदार झाले. त्याबरोबर हातकणंगले आणि कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस राष्ट्रवादीला मोठा सेटबॅक बसला. ज्या इचलकरंजीतून ही दंगलीची िणगी पडली त्या इचलकरंजीच्या अंगाखांद्यावर अजूनही दूरगामी परिणाम करणाऱ्या जखमा आहेत.

सध्या इचलकरंजी हे धगधगते आणि स्फोटक वातावरण असलेले शहर झाले आहे. एखादा फलक काढण्यावरून पोलिस आणि प्रशासनाशी एखाद्याचा वाद झाला तर क्षणात हजारो तरुण रस्त्यावर येतात. घोषणाबाजी होते. पोलिसही हतबलतेने हा सगळा उन्माद पहात राहतात. या उन्मादाला राजकीय नेतेही सोयीनुसार खतपाणी घालतात. इचलकरंजीत त्याची तीव्रता जास्त जाणवते.

गेल्या वर्षभरापासून येथे किमान चार ते पाच वेळा स्फोटक वातावरण निर्माण झाले. अगदी परवा-परवापर्यंत अख्खे शहर फलकांनी झाकले होते. यात मटकेवाले, खंडणीचे गुन्हे दाखल असलेलं, अपहरण, खून, खुनाचा प्रयत्न करणारे असे अनेक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांचे चेहरे झळकत होते. फलक लागत असताना संपूर्ण पोलिस खाते आणि पालिका प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून बसले होते. फलकांनी अख्खी इचलकरंजी झाकली तेव्हा प्रशासन जागे झाले. पोलिसांनी फलक उतरून घ्यायला सुरुवात केली. ही माहिती समजताच एका क्षणात हजारो लोकांचा जमाव मलाबादे चौकात जमला. घोषणाबाजी सुरू राहिली. कोणत्याही क्षणी काहीही होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा शहराचे नेतृत्व करणाऱ्या एका नेत्याने शांतता कमिटीच्या बैठकीतचकोणत्याही परिस्थितीत फलक उतरून घेतले जाणार नाहीत. कुणी एसपी जरी आला तरी काढू नका,’ असे आदेश चक्क एसपी प्रदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत दिल्याचे एका उद्योजकाने सांगितले.

याबाबत बोलताना हा उद्योजक म्हणाला, ‘या नेत्याच्या वक्तव्यावर काही उडाणटप्पू लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजविल्या असल्या तरी सामान्य लोकांनी त्याकडे नाराजीनेच पाहिले. आज आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी येथील काही नेते या सगळ्या घटनांकडे पहात असले तरी ही हा विषारी साप ते उशाला घेऊन झोपत आहेत,’ असा इशाराही त्याने दिला.

सर्वमामान्य लोक रात्री नऊनंतर बाहेर फिरायला जायला घाबरतात. एखाद्या शाळकरी मुलाने त्याच्या सायकलने धडक दिली आणि तुम्ही त्यालाका रे? ’ म्हटले की तो घरी जातो आणि गल्लीतील आठ-दहा मुले घेऊन तुमच्यावर चालून येतो. ही संस्कृती कुठली?,’ असा सवाल करताना तो म्हणाला, ‘आपण जे पेरू ते उगवते. काही दिवसांपूर्वी मुख्य रस्त्यावर रात्रीच्यावेळी काही तरुण रस्त्यावर दुचाकी आडवी लावून बसले होते. त्यावेळी एक चारचाकी आली. त्यांनी गाडी बाजूला घ्यायला सांगितले. मात्र, गाडी आमची नव्हेच. असे सांगून तरुणांचे टोळके बसून राहिले. तो चारचाकीवाला खाली उतरला, त्याने दुचाकी बाजूला काढली. त्यानंतर त्याला त्या टोळक्याने बेदम मारले. ही प्रातिनिधिक घटना असली तरी हा उन्माद राजकीय संरक्षणातून आला आहे. आपण काहीही केले तरी आपल्या केसालाही धक्का लागत नाही, हे या टोळक्यांना माहीत आहे. पोलिस प्रशासन राजकारण्याच्या ताटाखालचे मांजर झाले आहे. एक अशी तळघरातील सुप्त यंत्रणा येथे कार्यरत आहे की, एका क्षणात येथे हजारो लोकांना एकत्र आणून नंगानाच घालण्याची व्यवस्था केली आहे,’ असे सांगून त्या उद्योजकाने जणू गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जाळेच उलगडून सांगितले. कदाचित त्यामुळे हे उन्मादी तरुण राज्यकर्त्यांचे कच्चे भांडवल ठरल्याचे स्पष्ट होते. सध्या या कच्च्या भांडवलावर येथील राजकीय प्रवास अनेकांना करायचा आहे. त्यामुळेच येथील नेते तरुण म्हणतील तसे वागायला तयार आहे.

एखादा राजकीय नेता समाजाला दिशा देतो, असे म्हटले जाते. मात्र आता इचलकरंजीतील तरुण राजकीय नेत्यांना दिशा बदलायला भाग पाडत आहेत. त्याबाबत या नेत्यांची कोणतीही ना नाही. असेच मत येथील एका नगरसेवकाने व्यक्त केले. तो म्हणाला, ‘कधी काळी आम्ही विशिष्ट विचारसरणीचे म्हणून आम्हाला एक नेता दारातही उभा करून घेत नव्हता. पण आज त्याला समजले आहे की आमच्याशिवाय पर्याय नाही. म्हणूनच तो पोस्टर लावून आमची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करत आहे.’

एकीकडे राज्यातील वस्त्रोद्योगातील महत्त्वाचे शहर म्हणून इचलकरंजीची ओळख असताना अनेक कारणांनी या शहराची बदनामी होत आहे. मुळात या शहरातील मराठा, लिंगायत आणि कोष्टी समाजात परंपरागत हातमाग व्यवसाय होता. हळूहळू या व्यवसायाचे आधुनिकीकरण होत गेले. हातमागाचे यंत्रमाग झाले. आज अद्ययावत तंत्रज्ञानाचे अनेक लूम कारखाने इचलकरंजीत आहेत. मात्र, कारणपरत्वे हा व्यवसाय मूळ लोकांकडून राजस्थानी लोकांकडे हस्तांतरित झाला. आज यंत्रमाग, सायझिंग, सूतबाजार, कापडमार्केट राजस्थानी लोकांकडे आहे. यामध्ये त्यांचे वर्चस्व आहे. इचलकरंजीचे अर्थकारण या वस्त्रोद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळेच या व्यवसायाशी संबधित अनेक पोटव्यवसाय येथे आहेत. या व्यवसायात प्रामुख्याने वहीफणी, नॉटिंग आणि मेडिंग ही महत्त्वाची कामे आहेत. मुळात या कामांमध्ये कमी श्रमात खूप पैसा मिळतो. त्यामुळे अनेक गुंडांचा यावर डोळा असतो.

उद्योजक आणि यंत्रमाग व्यवसाय जागृती समितीचे अध्यक्ष विनय महाजन सांगतात, ‘इचलकरंजीत मूळच्या यंत्रमागधारकांकडून राजस्थानी समाजाकडे व्यवसाय हस्तांतरित झाला आहे. त्यामुळे स्थानिक संबंध संपुष्टात आले. एक प्रकारची वेगळी संस्कृती उदयाला आली. तुम्हाला येथे व्यवसाय करायचा असेल तर आम्ही सांगू तसे वागा, असाच प्रकार सध्या आहे. यातून जवळपास सर्वच व्यावसायिक खंडणीने त्रस्त आहेत. सगळ्यांच्याच मनात प्रचंड खदखद आहे. पण, हतबलतेमुळे कुणीही पुढे यायला तयार नाही. इचलकरंजीचे अर्थकारण वस्त्रोद्योगावर अवलंबून असेल तर सध्या हा वस्त्रोद्योग ज्वालामुखीसारखा खदखदत आहे. आपण इचलकरंजीला वस्त्रनगरी म्हणतो. पण, उद्योजकांच्या दृष्टीने ही नगरी अशांतनगरी आहे.’

परप्रांतीय कामगारांकडून खंडणी

येथे वस्त्रोद्योगावार आधारित अनेक व्यवसाय आहेत. यात आता स्थानिक कामगारांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. स्थानिक कामगारांना अॅडव्हान्स द्यावा लागतो. हा कामगार बेभरवशी असल्याचे यंत्रमागधारकांचे मत आहे. त्या तुलनेत बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानवरून आलेले कामगार तळ ठोकून राहतात. भरपूर काम करतात. अॅडव्हान्सचे ओझे नाही. ही आशादायक गोष्ट असली तरी या कामगारांकडून खंडणी वसूल करणारी टोळी मोठी आहे. एका कामगाराकडून महिन्याकाठी किमान पाचशे रुपये अशी लाखो रुपयांची खंडणी वसूल केली जाते. परप्रांतात आल्यानंतर भीतीपोटी हे मजूर बिनबोभाटपणे पैसे देतात.

अशा अनेक विळख्यांनी इचलकरंजीला वेढले आहे. दरवेळी काही संघटना आणि संवेदनशील व्यक्ती राजकीय नेत्यांना जाऊन भेटतात. वस्तुस्थिती कानावर घालतात. दुसरीकडे पोलिस प्रशासन कारवाई करण्यास उत्सूक नाही. या सगळ्याची सरमिसळ इतकी झाली आहे की धगधगत्या इचलकरंजीच्या आत या सगळ्या यंत्रणा बोथटपणे कार्यरत आहेत. ‘चलता है,’ ही घातक प्रवृत्ती सगळ्यांसाठी पुढील काळात मारक ठरणार आहे.

=====