Tuesday, September 18, 2018

OTHER

..तर ३५-४० रु. लिटरने देईन पेट्रोल: रामदेव बाबा


...तर ३५-४० रु. लिटरने देईन पेट्रोल: रामदेव बाबा
read more


ताजी प्रतिक्रिया
योग आणि आयुर्वेद हे तुमचे क्षेत्र. त्यावरच लक्ष केंद्रित करा बरे!
Uday Raut
















देशात जिथे काही ठिकाणी पेट्रोल ९० रुपये प्रति लिटर मिळत असताना योग गुरू आणि पतंजली आयुर्वेदचे संस्थापक रामदेव बाबा यांनी दावा केलाय की सरकारने परवानगी दिली तर ते ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल विकू शकतात.read more

एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'जर सरकार मला डिझेल-पेट्रोल विकण्याची परवानगी देईल आणि करात सवलत देईल तर मी भारतात ३५ ते ४० रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल देऊ शकतो. इंधनाला जीएसटीअंतर्गत आणण्याची गरज आहे. याला २८ टक्के कराच्या टप्प्यात आणायला नको.'

इंधनाच्या वाढत्या किंमती मोदी सरकारला महाग पडणार आहेत, असा इशाराही त्यांनी दिला. ते म्हणाले, 'खूप लोक मोदी सरकारच्या धोरणांचं कौतुक करतात. पण काही धोरणांमध्ये आता बदल व्हायला हवा. वाढत्या किंमतींवर सरकारला त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.' आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणार नाही असंही ते म्हणाले. मी राजकारणापासून लांब आहे. मी सर्वच पक्षांसोबत आणि स्वतंत्र आहे, असं त्यांनी सांगितलं

No comments: